निवारागृह सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:47+5:302021-01-03T04:15:47+5:30
गावातील पारांवर निवडणुकांची चर्चा नाशिक : ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले असून गावागावांतील पारांवर आणि मंदिरांच्या ओट्यांवर ...
गावातील पारांवर निवडणुकांची चर्चा
नाशिक : ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले असून गावागावांतील पारांवर आणि मंदिरांच्या ओट्यांवर निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे. निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्रत्येकाकडून आपापल्या परीने विजयाचे अंदाज बांधले जात आहेत. आपला दावा कसा खरा आहे, याचे समर्थनही केले जात आहे.
गरिबांना उबदार कपड्यांचे वाटप
नाशिक : शहर परिसरात थंडीचा कडाका जाणवत असल्याने अनेक सेवाभावी संस्थांकडून गोरगरिबांना उबदार कपड्यांचे वाटप केले जात आहे. काही संस्थांतर्फे ग्रामीण भागात आलेल्या ऊस तोडणी कामगारांनाही कपडे वाटप करण्यात येत आहे. यामुळे गोरगरिबांना दिलासा मिळत असून, समाधान व्यक्त केले जात आहे.
अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नाशिक : शहरातील गंजमाळ भागातील झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्वच्छतेमुळे डासांचा उपद्रवही वाढला असून नागरिकांना रात्रीची झोप घेणे कठीण झाले आहे. महापालिकेने परिसरात स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
सोमेश्वर परिसरात पर्यटकांची गर्दी
नाशिक : गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्याने सोमेश्वर येथील धबधबा खळाळू लागला आहे. यामुळे अनेक पर्यटकांची सोमेश्वर परिसरात गर्दी होऊ लागली आहे. शनिवार, रविवार सुटी असल्याने अनेक नागरिक फिरण्यासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे.