पेठ तालुक्यातील प्रस्तावित लघू सिंचन प्रकल्प सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 05:37 PM2021-01-17T17:37:05+5:302021-01-17T17:38:05+5:30
पेठ : गत अनेक वर्षापासून सर्वेक्षण करूनही शासन दरबारी प्रलंबित पडलेल्या पेठ तालुक्यातील लघू सिंचन प्रकल्पांना निधी मंजूर करून चालना मिळावी याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.
पेठ : गत अनेक वर्षापासून सर्वेक्षण करूनही शासन दरबारी प्रलंबित पडलेल्या पेठ तालुक्यातील लघू सिंचन प्रकल्पांना निधी मंजूर करून चालना मिळावी याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.
माळेगाव येथील जोगविहीर मंदिरावर तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांची बैठक भिका पाटील चौधरी यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये पेठ तालुक्यात मोठया प्रमाणावर पाऊस पडत असतांना केवळ सिंचन प्रकल्प नसल्याने उन्हाळ्यात जनतेला वणवण भटकत स्थलांतर करावे लागते.
शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर दिवसेंदिवस खालावत चालला असून गत ८ वर्षापासून शासन दरबारी प्रलंबीत असलेले नडगदरी, केळविहीर, राजबारी, काळूणे, उंबरदहाड, कुळवंडी, कडवईपाडा आदी प्रकल्पांना मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच सद्या कार्यान्वयीत असलेल्या धरणाच्या लाभ क्षेत्रात केटी वेअर बंधारे बांधावेत, पेठ येथील एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करावे, हमी भावापेक्षा कमी दराने भात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, पिक विमा योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी भिका चौधरी, अंबादास सातपुते, पुंडलिक सहारे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. रामदास वाघेरे यांनी सुत्रसंचलन केले.