वीजबिलांसह बँक वसुली थांबवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:16 AM2021-02-24T04:16:29+5:302021-02-24T04:16:29+5:30
महावितरणने वीज बील वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली असून वसुलीसाठी रोहित्र बंद केले जात आहेत. यामुळे शेतातील उभे पिक ...
महावितरणने वीज बील वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली असून वसुलीसाठी रोहित्र बंद केले जात आहेत. यामुळे शेतातील उभे पिक वीजेअभावी नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात भरीस भर म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडूनही कर्ज वसुलीसाठी सक्तीची मोहीम राबविली जात आहे. बँक वसुलीसाठी जमीन लिलाव प्रक्रिया राबवत आहे. यामुळे आधीच अर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आणखीणच अडचणीत सापडलाअसल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे. सद्य स्थितीत प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचा संघर्ष करणार्या शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास वीजे अभावी हिरावल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर बँक वसुलीच्या टांगत्या तलवारीने शेतकरी अधिक अडचणीत आला असून त्याचे मानसिक स्वास्थ्यही बिघडत आहे. शासनाने शेतकर्यांना न्याय देत दिलासा देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, आनंदा महाले, बाळासाहेब गायकवाड, अनिसभाई पटेल, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, पांडुरंग गायके आदींसह शेतकरी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
फोटो- २३ येवला फार्मर
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.
===Photopath===
230221\23nsk_40_23022021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ येवला फार्मरशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.