सक्तीची वसुली थांबवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 06:46 PM2018-09-03T18:46:29+5:302018-09-03T18:48:42+5:30

नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम राबवण्यात येत असून शेतकºयांची वाहने जप्त करून लिलाव केला जात आहे. अगोदरच शेतकरी वैतागलेला असताना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकºयांना त्रास दिला जात असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

 The demand to stop the compulsory recovery | सक्तीची वसुली थांबवण्याची मागणी

सक्तीची वसुली थांबवण्याची मागणी

Next

येवला : नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम राबवण्यात येत असून शेतकºयांची वाहने जप्त करून लिलाव केला जात आहे. अगोदरच शेतकरी वैतागलेला असताना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकºयांना त्रास दिला जात असल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे ही सक्तीची वसुली मोहीम थांबवावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार नरेश बहीरम यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार प्रकाश बुरु ंगले यांना देण्यात आले.  शेतकºयांनी पीककर्ज घेतले. तसेच शेती साधनांकरीता कर्ज घेतले. मात्र सलग दोन वर्षे दुष्काळी परीस्थिती, नोटबंदी काळात शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. बोंडअळी, डाळिंबावर तेल्या रोगामुळे शेतक-यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले. आता कांदा पीकातून थोडेफार पैसे मिळतील अशी शेतकºयांना आशा आहे. टमाट्याची मोठ्या प्रमाणावर खर्च करून लागवड केली. परंतु टमाटा ७० ते८० रु पये क्र ेटप्रमाणे विक्र ी चालू आहे. शेतमालाला भाव नसल्याने कवडीमोल भावात शेतमाल विक्र ी करावा लागत आहे. यातून उत्पादन खर्च भरून निघणेही मुश्किल झाले आहे. दुसºया बाजूला बँक अडचणीत आल्याचे सांगून शेतकºयांकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम जिल्हा बँकेने सुरू केली आहे. मात्र बँकेच्या संचालक मंडळातील काही सदस्यांनी स्थापन केलेल्या संस्थांना वारेमाप कर्जवाटप केले. तोट्यात असलेल्या साखर कारखान्यांना कर्जवाटप केले. मात्र त्याचे खापर शेतकºयांवर फोडले जात आहे. त्यामुळे या सर्व बाबींची चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर संतू झांबरे, संध्या पगारे, अरु ण जाधव, बापूसाहेब पगारे, गोरखनाथ जगझाप, सुभाष कोटमे, बाळासाहेब गायकवाड, योगेश सोमवंशी, वसंत पवार, प्रभाकर भोसले, विठ्ठल वाळके, बाळसाहेब मढवई, साहेबराव जगझाप, सुभाष सोनवणे, शांतीलाल जाधव, लहानू जाधव आदींसह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.

 

Web Title:  The demand to stop the compulsory recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.