शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:32+5:302021-03-05T04:14:32+5:30
शासनाने १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण करण्यासाठी आदेशित केले आहे. परंतु महाराष्ट्रासह संपूर्ण ...
शासनाने १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण करण्यासाठी आदेशित केले आहे. परंतु महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोना या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने त्याबाबत उपाय योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनदेखील सुरू झालेले आहे, पुणे, अमरावती, औरंगाबाद, नाशिक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून पालकांनीदेखील या सर्वेक्षणासाठी विरोध दर्शविला आहे. सध्या इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग सुरू असून त्यांच्या अध्यापनाचे, शालांत परीक्षेची पूर्वतयारी कामकाज महत्त्वाचे आहे. या परिस्थितीत शिक्षकांना बाहेर पाठविणे जोखमीचे व विद्यार्थी हिताचे नाही त्यामुळे या मोहिमेस तूर्त स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद, राज्य उपाध्यक्ष अल्ताफ अहमद, रईस अहमद, साजिद हमीद आदी पदाधिका-यांनी केली आहे.