वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 06:23 PM2020-07-01T18:23:33+5:302020-07-01T18:23:58+5:30
मालेगाव : शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून कमी जास्त दाबामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याने वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी गणेशोत्सव समिती व शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात कमी अधिक दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांचे टी. व्ही., फ्रीज, संगणक, इनव्हरर्टर यांचे नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीने याची भरपाई करुन द्यावी. अनेक झाडांच्या फांद्या तुटून विद्युत वाहक तारांमध्ये अडकल्या आहेत. त्यामुळे पावसात शॉर्ट सर्किट होतो. झाडांच्या फांद्यांचा विस्तार कमी करावा. रस्त्यातील वेडेवाकडे विजेचे खांब बाजूला घ्यावेत. खराब तारा काढून नवीन विद्युत तारा टाकाव्यात आदि मागण्या अनिल देवरे, जितेंद्र देसले, भरत पाटील, राजेश अलिझाड, दिपक पाटील, कैलास शर्मा, सुनील पाटील, दिपक कदम, सुनील चांगरे, हरीष मारू आदिंनी केली आहे.
फोटो फाईल नेम : ०१ एमजेयुएल ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी वीज पुरवठा सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना सादर करताना भरत पाटील, जितेंद्र देसले, भरत पाटील, राजेश अलिझाड, दिपक पाटील, कैलास शर्मा, सुनील पाटील आदि.