गर्दीमुळे विद्यार्थी पास ची मुदत वाढवून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 05:57 PM2018-12-19T17:57:54+5:302018-12-19T17:58:11+5:30
सिन्नर : तालुक्यातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी पासचे वितरण होत असल्याने तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची येथे मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे.
सिन्नर : तालुक्यातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी पासचे वितरण होत असल्याने तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची येथे मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे. येथील बसस्थानकात होत असलेला विद्यार्थ्यांचा गोंधळ, हाणामारीमुळे बस पासचे वितरण एक वर्ष किंवा सहा महिन्यांच्या कालावधीसाठी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिन्नर तालुका संभाजी ब्रिगेड शाखेचे तालुकाध्यक्ष आनंदा सालमुठे, विधानसभा अध्यक्ष सुभाष कुंभार, तालुका सचिव भरत सूर्यवंशी, शहर संघटक सुनील होळकर यांनी आगार व्यावस्थापकांची भेट घेऊन निवेदन दिले. सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बस पास मोफत करण्याची घोषणा राज्य शासनाने सुरू केली, दिवाळीच्या सुटीनंतर विद्यार्थ्यांना मोफत पासचे वितरणही सुरू केले. मात्र, संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी पासचे वितरण होत असल्याने तालुक्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनींची येथे सिन्नर येथील बसस्थानकात मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे.