बस सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 08:47 PM2019-09-19T20:47:23+5:302019-09-19T20:47:49+5:30
देवळा : महालपाटणे व परिसरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बस नसल्यामुळे गैरसोय होत असून दुपारी बारा वाजता बस उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन महालपाटणेतील विद्यार्थ्यांनी सटाणा आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक पी. एच. महाजन यांना दिले.
देवळा : महालपाटणे व परिसरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बस नसल्यामुळे गैरसोय होत असून दुपारी बारा वाजता बस उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन महालपाटणेतील विद्यार्थ्यांनी सटाणा आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक पी. एच. महाजन यांना दिले.
महालपाटणे, निंबोळा, रण्यादेवपाडा, देवपूरपाडा या परिसरातून शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी मेशी व देवळा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी बसने नियमितपणे येतात. सकाळी महाविद्यालयीन वेळेत विद्यार्थ्यांना बस असते. परंतु बारा वाजेनंतर विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी बस नसल्याने पायपीट करावी लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
विद्यार्थिनींचे सर्वाधिक हाल होत असून दररोजच्या पायपीटीमुळे कंटाळलेल्या विद्यार्थीनींमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाल्यामुळे शिक्षण सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सटाणा आगाराने दुपारी बारा वाजेच्या सुमारास देवळा ते महालपाटणे अशी बस सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महालपाटणे ग्रामपंचायतीच्या वतीने सटाणा आगाराकडे करण्यात आली आहे.
यावेळी ज्ञानेश्वर देवरे, सरपंच जिजा नवरे, सागर खरोले, सुनील सावंत, गणेश सूर्यवंशी, राकेश सोनवणे, योगेश आहेर, किरण अहिरे, युवराज शेलार, चेतन चित्ते, किरण खैरनार, महेश खरोले, नंदू अहिरे, राहुल शेवाळे, रोशन महिरे, प्रवीण पवार, आदित्य सूर्यवंशी, तेजस अहिरे, दिनेश मोरे, अभिजित गोसावी, ज्ञानेश्वर पवार, सागर चव्हाण, राहुल खरोले, समाधान कुमावत, दिनेश देवरे, साईनाथ डावरे आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.