चंदन शेतीला प्रोत्साहनासाठी अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 12:18 AM2022-01-11T00:18:12+5:302022-01-11T00:18:58+5:30

सिन्नर : सिन्नरसह राज्यातील चंदन शेतीला समस्यांनी ग्रासले आहे. चंदन शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना करून अनुदान देण्याची मागणी शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.

Demand for subsidy for promotion of sandalwood farming | चंदन शेतीला प्रोत्साहनासाठी अनुदान देण्याची मागणी

चंदन शेतीला प्रोत्साहनासाठी अनुदान देण्याची मागणी

Next
ठळक मुद्देकृषिमंत्री भुसे यांची भेट घेत चंदन शेतीच्या व्यथा मांडल्या.

सिन्नर : सिन्नरसह राज्यातील चंदन शेतीला समस्यांनी ग्रासले आहे. चंदन शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना करून अनुदान देण्याची मागणी शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.

यावेळी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, राम सुरसे, कन्हैयालाल भुतडा, विजय सोमाणी आदींनी कृषिमंत्री भुसे यांची भेट घेत चंदन शेतीच्या व्यथा मांडल्या.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चंदन शेती उभी राहात आहे. शेतकऱ्यांना दुष्काळावर मात करण्यासाठी व देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी चंदन वरदान ठरत आहे. यासाठी कृषी विभागाकडून अनुदानाची मागणी करण्यात आली.

चंदन शेतीला विमा संरक्षण मिळावे, सोलर कंपाऊंड, सीसीटीव्ही कॅमेरा, मायक्रो चीप, ड्रोन कॅमेरा आदीबाबत शासकीय स्तरावर अनुदान मिळावे, शेतकऱ्यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना द्यावा, लागवड व संगोपनासाठी बँकेकडून आर्थिक सहाय्य मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या.

Web Title: Demand for subsidy for promotion of sandalwood farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.