भोये आत्महत्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची निलंबनाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:15 AM2020-12-31T04:15:45+5:302020-12-31T04:15:45+5:30

पिंपळगाव बसवंत : नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्यातील सखाराम भोये या आदिवासी समाजाच्या पोलीस कर्मचाऱ्याने बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केली ...

Demand for suspension of police inspector in Bhoye suicide case | भोये आत्महत्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची निलंबनाची मागणी

भोये आत्महत्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची निलंबनाची मागणी

Next

पिंपळगाव बसवंत : नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्यातील सखाराम भोये या आदिवासी समाजाच्या पोलीस कर्मचाऱ्याने बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केली असून, त्यांच्या आत्महत्येस पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी हेच कारणीभूत आहे. त्यामुळे यांना निलंबित करा, अशा मागणीचे निवेदन रावण युवा फाउंडेशनने उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग व तहसील कार्यालयात देऊन केली आहे.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी हे वारंवार सखाराम भोये यांना जातीवाचक टोमणे व टोचून बोलणे, शिवीगाळ करत होते, तसेच वेळोवेळी भोये हे अपमान, अन्याय, अत्याचार सहन करत होते. मात्र, बुधवार, दि २३ रोजी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्या समोर हवालदार सखाराम भोये यांना शिवीगाळ करत, अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे भोये यांनी कंटाळून निरीक्षकांच्या दालनात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून भोये यांनी आत्महत्या करत, स्वतःला संपविल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी विकी मुंजे, प्रभाकर फसाळे, सागर भोईर, सागर पुराणे, त्र्यंबक झोले, समाधान बदादे, राहुल झोले, सचिन मराडे आदीसह युवा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

----------------------

निवेदन देताना रावण युवा फाउंडेशनचे विकी मुंजे, प्रभाकर फसाळे, सागर पुराणे, त्र्यंबक झोले, समाधान बदादे, राहुल झोले आदी. (३० पिंपळगाव १)

===Photopath===

301220\30nsk_3_30122020_13.jpg

===Caption===

३० पिंपळगाव १

Web Title: Demand for suspension of police inspector in Bhoye suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.