‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:18 AM2018-03-17T01:18:18+5:302018-03-17T01:18:18+5:30
शहरात अवैध दारू विक्री करणाºयांना प्रोत्साहन देणाºया पोलीस कर्मचाºयांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी अंबिकानगर परिसरातील आदिवासी महिला मंडळाने पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपळगाव बसवंत : शहरात अवैध दारू विक्री करणाºयांना प्रोत्साहन देणाºया पोलीस कर्मचाºयांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी अंबिकानगर परिसरातील आदिवासी महिला मंडळाने पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पिंपळगाव शहराचे आराध्य दैवत असलेल्या अंबिकामाता मंदिरासमोर एका हॉटेलमध्ये अवैध दारू विक्र ी सुरू होती, या दारू विक्रीला पोलिसांचे अभय आहे, असे निवेदनात म्हटले आहे. अंबिकानगर परिसरातील शेकडो महिलांनी गुरु वारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अवैध दारू विक्र ी करणाºया हॉटेलची तोडफोड करत सदर हॉटेल बंद पाडले. यासंदर्भात बिटमधील पोलीस कसर्मचºयांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात चुकीचा गुन्हा दाखल करत अवैध दारू विक्री करणाºया इसमास काही वेळातच सोडून दिले. यासंदर्भात संपूर्ण चौकशी करून बिटमधील पोलीस कर्मचाºयांना निलंबित करावे, आठ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे. सातवड परिसरात महिलांनी अवैध दारू विक्र ी करणाºया दुकानाची शुक्रवारी सकाळी ११वाजेच्या सुमारास तोडफोड केली़ महिलांचा आक्रमक पवित्रा पाहून दुकानदाराने पाराशरी नदीतून पळ काढला. यावेळी शांताबाई गांगुर्डे, विठाबाई पवार, संगीता कराटे, रंजना गहिले, सुमन बेडक, अनुसया पवार, हिराबाई धुळे, लता घोरपडे आदींसह महिला उपस्थित होत्या.