निवेदन : पेन्शन, कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ..तर तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:00 AM2018-02-28T01:00:25+5:302018-02-28T01:00:25+5:30
निफाड : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
निफाड : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही आणि अर्थसंकल्पात शेतकºयांना पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत निफाड तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन निफाड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निफाडचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना देण्यात आले. निवेदनात मराठवाड्यात शेतकºयांना जाहीर झालेली फसवी कर्जमाफी आणि गारपिटीने शेतीचे झालेले नुकसान यामुळे तेथील शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला असून, सरकारने या नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी चार हजार चारशे रुपये नुकसानभरपाई देऊ केली आहे. परंतु शेतकºयांचा नुकसान झालेला शेतमाल बाहेर काढण्यासाठी हेक्टरी दहा हजार रुपये खर्च येत आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी उस्मानाबादच्या सभेत राज्यातील मंत्र्यांना आडवा आणि जाब विचारा असे आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांना दिला होता.
निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ बोराडे, भाऊसाहेब तासकर, निवृत्ती गारे, सुधाकर मोगल, नितीन कोरडे, विकी आरोटे, रामदास गवळी, पुंजाराम कडलग, माधव रोटे, नाना ताकाटे, सागर बोराडे, रवि शिंदे, शिवाजी गाजरे, जयराम जाधव, उत्तम मोगल, संगम गांगुर्डे आदींची नावे आहेत.