दत्तू भोकनळला शासकीय सेवेत घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:39 PM2020-12-12T12:39:23+5:302020-12-12T12:39:48+5:30
ओझर : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारा रोईंगपटु दत्तु भोकनळ याला शासकिय सेवेत वर्ग एक च्या पदावर थेट नियुक्त करावी अशा आशयाचे निवेदन माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना दिले.
ओझर : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारा रोईंगपटु दत्तु भोकनळ यांना शासकिय सेवेत वर्ग एक च्या पदावर थेट नियुक्त करावी अशा आशयाचे निवेदन माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना दिले. यावेळी राऊत यांनी याबाबत तातडीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. यावेळी भोकनळ देखील उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारा केंद्र सरकारा अर्जुन पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित दत्तु भोकनळ यांनी रोईंग या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. याबद्दल भोकनळ यांना केंद्र व राज्य शासनाने पुरस्कार सन्मानित केलेले आहे. ज्या वेळी भोकनळ याला पुरस्कार दिले त्याचवेळी त्याला त्याला शासकिय सेवेत वर्ग एक च्या श्रेणीत सामावुन घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. २०१६ मध्ये आॅलंप्मिक स्पर्धत भोकनळ याने १३ वे स्थान पटकावले तर २०१८ मध्येआशियाई स्पर्धत सुवर्ण पदक पटकावले होते. याची दखल घेत केंद्र व राज्य सरकाने भोकनळ यांना अनुक्रमे अर्जुन व शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित देखील केले होते. याबाबत भोकनळ यांनी कदम यांची भेट घेत निवेदन दिले.