आॅनलाइन कामावर शिक्षकांचा बहिष्कार शिक्षणाधिकाºयांना निवेदन : प्रलंबित प्रश्न सोडवण्याची समन्वय समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:39 AM2017-12-04T00:39:16+5:302017-12-04T00:41:32+5:30

Demand for teachers' boycott online at teaching work: Request for coordination committee to solve pending issues | आॅनलाइन कामावर शिक्षकांचा बहिष्कार शिक्षणाधिकाºयांना निवेदन : प्रलंबित प्रश्न सोडवण्याची समन्वय समितीची मागणी

आॅनलाइन कामावर शिक्षकांचा बहिष्कार शिक्षणाधिकाºयांना निवेदन : प्रलंबित प्रश्न सोडवण्याची समन्वय समितीची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देआॅनलाइन कामावर शिक्षकांचा बहिष्कार शिक्षणाधिकाºयांना निवेदन : प्रलंबित प्रश्न सोडवण्याची समन्वय समितीची मागणी

नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये परिपूर्ण तंत्रसुविधा व विजेची सोय नसताना आॅनलाइन कामामुळे शिक्षकांची कोंडी होत असल्याने आॅनलाइन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीने केली आहे. यासह शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी समितीतर्फे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांना रविवारी (दि.३) निवेदन देण्यात आले.
शिक्षकांना विविध प्रकारची आॅनलाइन माहिती भरण्यास अडचण येत असल्याने राज्यभरातील शिक्षकांनी बहिष्कार टाकला असून, यापुढे जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापक आॅफलाइन काम करणार असल्याची माहिती शिक्षक समन्वय समितीचे राजेंद्र दिघे यांनी दिली आहे. शिक्षकांवर आॅनलाइन कामकाजासाठी प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे दडपण आणू नये, आॅनलाइन माहितीमुळे अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, अनेक प्राथमिक शाळांमध्ये वीज बिल थकीत झाल्याने पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
परिणामी शासनाने वीज बिलासाठी कुठलीही आर्थिक तरतूद केलेली नाही. शिक्षकांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे आॅनलाइनसह तत्सम कामासाठी स्वतंत्र शिक्षकाला ही कामे करावी लागतात, या सर्व बाबींमुळे शिक्षकांची मानसिकता बिघडली असून, सर्व विद्यार्थ्यांसह शाळा प्रगत करण्यात अडथळे निर्माण होतात, गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होतो, असेही निवेदनात नमूद केले आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी यापुढे सर्व माहिती पूर्वीप्रमाणे आॅफलाइन देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन समन्वय समितीचे आनंदा कांदळकर, आर. के. खैरनार, सुभाष अहिरे, केदराज कापडणीस, राहुल सोनवणे, राजेंद्र दिघे,मोतिराम नाठे, उत्तम केदारे, प्रकल्प पाटील, कैलास पगार, बी. जे. सोनवणे आदींनी निवेदनाच्या माध्यमातून केले आहे. शिक्षकांना डीसीपीएस कपातीचा हिशेब देण्यात यावा, चटोपाध्याय वेतनश्रेणी व निवड श्रेणी लागू करावी, पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदोन्नतीची कार्यवाही करावी, आदिवासी भागातील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, सहाव्या वेतन आयोगातील भविष्य निर्वाह निधीचा हप्ता जमा करण्यात यावा, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण त्वरित करावे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.

Web Title: Demand for teachers' boycott online at teaching work: Request for coordination committee to solve pending issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन