आमिष दाखवून ठकसेनने लुटले सोने बनवाबनवी : ज्येष्ठ नागरिकांना सरकारी मदत मिळत असल्याची बतावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:27 AM2018-01-01T00:27:23+5:302018-01-01T00:28:26+5:30
सटाणा : वयोवृद्ध लोकांना तहसील कचेरीत सरकारकडून चाळीस हजार रुपये मिळत असल्याची बतावणी करून सटाण्यातील माजी नगरसेवक मुन्ना रब्बानी शेख यांच्या वयोवृद्ध मातापित्याला एका ठकसेनने रिक्षामध्ये नेऊन सटाणा तहसील आवारात त्यांच्याकडील तीन तोळे सोन्याचे दागिने लुटल्याने खळबळ उडाली आहे.
सटाणा : वयोवृद्ध लोकांना तहसील कचेरीत सरकारकडून चाळीस हजार रुपये मिळत असल्याची बतावणी करून सटाण्यातील माजी नगरसेवक मुन्ना रब्बानी शेख यांच्या वयोवृद्ध मातापित्याला एका ठकसेनने रिक्षामध्ये नेऊन सटाणा तहसील आवारात त्यांच्याकडील तीन तोळे सोन्याचे दागिने लुटल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
माजी नगरसेवक मुन्ना रब्बानी शेख यांच्या आई कमरुनिसा रब्बानी शेख यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या त्याच्यावर विश्वास ठेवत कमरुनिसा पुन्हा रिक्षाने घरी गेल्या आणि तीन तोळे सोन्याच्या दागिन्यासह पती रब्बानी गुलाम शेख यांना घेऊन तहसील कचेरीत आल्या. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने रब्बानी शेख यांना तहसील कचेरीत नेले व तुम्ही बाहेरच थांबा असे कमरुनिसा यांना सांगितले.
पुन्हा दहा मिनिटांनी तो इसम बाहेर आला व तुमचे दागिने तुमच्या पतीने मागितले असे सांगत तुम्हाला तहसीलमध्ये अधिकाºयांनी विचारल्यावर तुम्ही गरीब आहेत असेच सांगायचे म्हणून निघून गेला; मात्र काही वेळाने रब्बानी शेख तहसील कचेरीतून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्नीला त्या इसमाबाबत विचारले असता तो दागिने घेऊन फरार झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सटाणा पोलिसांत अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी आठवडे बाजारात गेल्या होत्या. पोलीस चौकीजवळून त्या जात असताना त्यांना एक अनोळखी इसम भेटला. त्याने स्वत:हून कमरुनिसा यांना मुझे पहचाना नही क्या? मै रफिक हाजी का लडका हूं। आप मेरे साथ चलो। सटाणा तहसील कचेरी मे बुढे लोगोंको चालीस हजार रु पये मिल रहे है, असे सांगितले. त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवत त्या रिक्षामध्ये बसून तहसीलमध्ये गेल्या. तहसील कचेरीच्या नवीन इमारतीजवळ त्यांना बसवून तो अज्ञात इसम तहसील कचेरीत जाऊन आला. त्यानंतर त्याने कमरुनिसा यांना तुमच्याकडे सोन्याची दागिने आहेत का, असे विचारत असतील तर ते घरून घेऊन येऊ आणि सोबत तुमचे पतीही लागतील तर त्यांनाही घेऊन येऊ असे सांगत याबाबत कोणाला काही सांगू नका असे सांगितले.