दुधाला सरसकट अनुुदान देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 09:06 PM2020-07-24T21:06:22+5:302020-07-25T01:06:51+5:30
येवला : गायीच्या दुधाला प्रतिलिटर सरसकट १० रुपये, तर दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणी तातडीने मान्य न झाल्यास १ आॅगस्ट रोजी भाजपा, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइं महायुतीच्या वतीने राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या संकटांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोना काळात दुधाच्या विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट आली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. खासगी संस्था व सहकारी दूध संघाकडून दूध १५ ते १६ रु. दराने खरेदी केले जात आहे. त्यात दुधाचा उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही.
गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रु पये तर दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रु पये अनुदान मिळावे, शासनाने ३० रुपये प्रतिलिटर दराने दुधाची खरेदी करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक सांगळे, तालुकाध्यक्ष शंकर गोरे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अरु ण जाधव, रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस संजय पगारे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
------------------
शासनाने १० लाख लिटर दूध २५ रुपये प्रतिलिटर या दराने खरेदी करण्याची घोषणा केली होती; परंतु प्रत्यक्षात सात लाख लिटर दूध खरेदी केले जात आहे. मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दूध संघाकडून शासन दूध घेत आहे. शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना शासनाने वाºयावर सोडल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़