सप्तशृंगीदेवी विश्वस्त निवड पारदर्शीपणे करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 09:38 PM2020-09-07T21:38:27+5:302020-09-08T01:19:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : सप्तशृंगीदेवी निवासिनी ट्रस्टच्या विश्वस्त निवडीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी प्रधान न्यायाधीश तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for transparent selection of Saptashrungi Devi trustee | सप्तशृंगीदेवी विश्वस्त निवड पारदर्शीपणे करण्याची मागणी

सप्तशृंगीदेवी विश्वस्त निवड पारदर्शीपणे करण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देदेवस्थानमध्ये नऊ किंवा ११ सदस्यांची निवड करावी, अशी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सप्तशृंगीदेवी निवासिनी ट्रस्टच्या विश्वस्त निवडीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी प्रधान न्यायाधीश तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सप्तशृंगीदेवी देवस्थान विश्वस्तांच्या निवड प्रक्रियेची जाहिरात विशिष्ट नमुन्यात तसेच नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अर्धपीठातील विश्वस्तांची नेमणूक ही सर्वच नागरिकांना माहिती होणे गरजेचे असताना तसे प्रत्यक्षात झाले नाही. देवस्थानच्या संकेतस्थळावरही ट्रस्टची माहिती, अध्यक्षांचे मनोगत देण्यात आलेले नाही.
ट्रस्टची निवडप्रक्रिया करताना कोणत्याही प्रसिद्धिमाध्यमात जाहीर प्रगटन देण्यात आलेले नाही. फक्त पुरुषच विश्वस्त असतील तर यापुढे घटनेत बदल करून एकतृतीयांश महिलांना प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे. ज्यांनी विश्वस्त पदाकरिता अर्ज केलेले आहेत, त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन व आवश्यक ती इतर कागदपत्रेसुद्धा दाखल होणे आवश्यक आहे. शेकडो वर्षांपासून नित्यनियमाने पूजाअर्चा करणाºया पुजाऱ्यांनाही एक एक प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे.
देवस्थानमध्ये नऊ किंवा ११ सदस्यांची निवड करावी, अशी मागणीही शिंदे यांनी या निवेदनात केली आहे.

Web Title: Demand for transparent selection of Saptashrungi Devi trustee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.