आदिवासी संस्कृती केंद्राची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 09:54 PM2020-08-19T21:54:14+5:302020-08-20T00:18:18+5:30
पेठ : नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पेठ, दिंडोरी व सुरगाणा तालुक्याच्या ओझरखेड या मध्यवर्ती ठिकाणी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे भव्य संस्कृती केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिलेल्या निवेदनात, आदिवासी संस्कृतीची अस्मिता जतन करण्यासाठी व आद्य क्रांतिकारकांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठीओझरखेड येथे भगवान बिरसा मुंडा स्मारक व बहुद्देशीय संस्कृतिदर्शक केंद्र साकारण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी जनार्दन खोटरे, संजय गवळी, दुर्गादास गायकवाड, गितेश्वर खोटरे, देवीदास कामडी, संदीप फोगट, राकेश दळवी आदी उपस्थित होते.