टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:00 AM2017-09-11T00:00:27+5:302017-09-11T00:08:57+5:30
ग्रामीण भागातून सटाण्यात येणाºया शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनी शहरातील टवाळखोर तरुणांना त्रस्त झाल्या असून, या गंभीर प्रकाराचा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत आहे.
सटाणा : ग्रामीण भागातून सटाण्यात येणाºया शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनी शहरातील टवाळखोर तरुणांना त्रस्त झाल्या असून, या गंभीर प्रकाराचा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत आहे. सटाणा येथील जिजामाता कन्या विद्यालय परिसरातील दोधेश्वर नाका आणि सटाणा बस स्थानक परिसरात टवाळखोरीचे सर्वाधिक प्रमाण असून यावर अंकुश आणण्यासाठी या परिसरात शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत पोलीस कर्मचाºयाची नेमणूक करण्याची मागणी महाराणा प्रताप क्र ांती दल संघटनेने पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्याकडे केली आहे.
शहरात शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी येतात. अलीकडच्या काळात महाविद्यालयीन तरु णींची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर आपले कुटुंबीय शिक्षण बंद करून टाकतील या भीतीने अनेक विद्यार्थिनी हा प्रकार निमूटपणे सहन करतात . एखाद्या विद्यार्थिनीने याबाबत घरी तक्र ार केल्यावर तिचे पालक तिच्या सोबत आलेच तर त्यांना देखील टवाळखोरांकडून दमदाटी केली जात आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी स्वत: याबाबत लक्ष घालून पोलीस कर्मचारी नेमण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी तरसाळीचे प्रभारी सरपंच लखन पवार, नाना मोरकर, प्रभाकर पवार, प्रवीण चव्हाण, सुनील पवार, भाजप युवती तालुकाध्यक्ष रु पाली पंडित, नाना गोसावी, अतुल धुमाळ, विलास अहीरे, अनिल पवार आदि उपस्थित होते.