भाकपकडून आघाडीकडे दोन जागांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:11 AM2019-10-02T01:11:13+5:302019-10-02T01:12:03+5:30

नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Demand for two seats from CPI-M front | भाकपकडून आघाडीकडे दोन जागांची मागणी

भाकपकडून आघाडीकडे दोन जागांची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देसमविचारी पक्षांशी आघाडी करूनच लढण्याचा पक्षाचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आयटक कामगार केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कांगो यांनी समविचारी पक्षांशी आघाडी करूनच लढण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. बुधवारी होणाºया राज्यस्तरीय बैठकीत त्याबाबत वाटाघाटी करून अंतिम निर्णय होणार आहे. त्यात पक्षाला किती जागा मिळतात, सन्माननीय तडजोड होते का? त्याबाबतचा निर्णयदेखील पक्षाचे राज्यनेतृत्व घेणार आहे. त्यातदेखील भाजप-शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांचा कोणताही फायदा होऊ नये, असेच आमचे प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. कांगो यांनी नमूद केले.
महाराष्टÑाच्या राजकारणाची वाटचालदेखील केरळ, तामिळनाडूप्रमाणे दोन आघाड्यांतील संघर्षाकडे होत असल्याचे दिसत आहे. जनता केंद्र आणि राज्यातील भाजपच्या कारभाराने त्रस्त झाली असून, मंदीमुळे कामगार आणि चुकीच्या धोरणांमुळे कृषिक्षेत्र संकटात सापडले आहे. त्यामुळे हे दोन्ही वर्ग आता भाजप आणि युतीच्या विरोधात मतदान करणार असल्याचा दावादेखील कांगो यांनी केला.
दरम्यान, भाकपने जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने या मतदारसंघातील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारी आरंभली आहे. नांदगावमध्ये एकदा यश भाकपने आजवर जिल्ह्यात अनेकदा विधानसभा निवडणूक लढविलेली आहे. यापूर्वी भाकपला नांदगाव मतदारसंघातून यश मिळालेले आहे. या मतदारसंघातून माधवराव गायकवाड यांनी विजय संपादन केलेला होता. जिल्ह्यात माकपचे अस्तित्व दिसून येत असताना भाकपची ताकद घटलेली दिसून येते. आमचे ज्या ठिकाणी भक्कम उमेदवार आहेत, त्याच जागा आम्ही लढवणार आहोत. कॉँग्रेस आघाडीत स्थान मिळाले तर अशा जागी आम्ही वंचित बहुजन आघाडीकडूनही पाठिंबा घेणार आहोत. मात्र, कॉँग्रेस आघाडीत स्थान मिळाले नाही तर आमच्या जागांवर वंचितकडून पाठिंबा तर ज्या जागी वंचितचे दमदार उमेदवार असतील, अशा ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना खुला पाठिंबा देण्यात येणार असल्याचेही डॉ. कांगो यांनी नमूद केले.

Web Title: Demand for two seats from CPI-M front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.