शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या  रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:54 AM2018-11-20T00:54:56+5:302018-11-20T00:55:16+5:30

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या रिक्त जागांवर नोकरभरती करण्यासोबतच विनाअनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विनाअट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्हा शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ व कृती समितीतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

 The demand for the vacant seats of teachers and non-teaching employees to be done promptly | शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या  रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या  रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी

Next

नाशिक : राज्यातील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाºयांच्या रिक्त जागांवर नोकरभरती करण्यासोबतच विनाअनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विनाअट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्हा शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ व कृती समितीतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील शिक्षकांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून राज्य सरकार शिक्षकांच्या मागण्यांकडे दुलक्ष करीत असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ व संयुक्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकाºयांना शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले. राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिक्षकांची भरती करण्यासोबत विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देणे, जुनी पेंशन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, आदि मागण्यांही शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्या आहेत. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष के. के. अहिरे, राज्य पदाधिकारी शेलार, विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, सी. बी. पवार, जयवंत भाबड, चंद्रशेखर शेलार, कैलास पगार, प्रकल्प पाटील, पुष्पा गांगुर्डे, विजया पाटील आदि शिक्षक उपस्थित होते.  शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारिणीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना नासिक जिल्हा शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ व संयुक्त कृती समितीतर्फे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title:  The demand for the vacant seats of teachers and non-teaching employees to be done promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.