सर्व केमिस्टना कोविड लस देणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:16+5:302021-03-14T04:14:16+5:30
सिन्नर: शहर व तालुक्यातील सर्व केमिस्ट (औषध विक्रेते )फार्मासिस्ट व कर्मचारी यांना शासनाने प्राधान्य क्रमाने कोविड लस द्यावी, अशा ...
सिन्नर: शहर व तालुक्यातील सर्व केमिस्ट (औषध विक्रेते )फार्मासिस्ट व कर्मचारी यांना शासनाने प्राधान्य क्रमाने कोविड लस द्यावी, अशा आशयाचे निवेदन सिन्नर तालुका केमिस्ट सोशल ग्रुपच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांना देण्यात आले. शासनाने १ मार्च पासून हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस उपलब्ध करून दिली आहे. तसेच ४५ ते ५९ वयोगटातील मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनी आजाराने त्रस्त (कोमॉरबीड) झालेल्या रुग्णांसाठी देखील लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोना काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या व जीवाची पर्वा न करणाऱ्या केमिस्ट, फार्मासिस्ट यांना मात्र लसीकरणापासून वंचित ठेवण्यात आले. कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आलेल्या केमिस्टना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. मात्र त्यांनाच लसीकरणापासून वंचित ठेवले याचे सखेद आश्चर्य वाटत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. औषध दुकानात काम करणाऱ्या केमिस्ट, फार्मासिस्ट, कर्मचारी यांना कोरोना लस त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केमिस्ट सोशल ग्रुपचे अध्यक्ष शैलेश पाटील, अनिल वाजे, राजेंद्र हांडोरे, अतुल झळके, सचिन वाळुंज, सचिन गोराडे या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.