सरकारी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:23+5:302021-05-17T04:13:23+5:30
ओझरला आढळले १४ बाधित रुग्ण ओझरटाऊनशिप : ओझर येथे प्राप्त झालेल्या अहवालात १४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. ...
ओझरला आढळले १४ बाधित रुग्ण
ओझरटाऊनशिप : ओझर येथे प्राप्त झालेल्या अहवालात १४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी सतत वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येत सतरा दिवसांपासून घट होत आहे. ओझरसह परिसरातील १४ रुग्णांचा अहवाल बाधित आला आहे त्यामध्ये ओझरटाऊनशिपमधील ५ रुग्णांचा, दिक्षी १, शिवाजी नगर १, गाडेकर वाडी १, कासार गल्ली १, सिन्नरकर टाऊन १, दहावा मैल १, सोनेवाडी २, सुतार गल्लीतील एका रुग्णाचा समावेश आहे.
येवल्यात २४ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
येवला : तालुक्यातील २४ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी, (दि. १६) पॉझिटिव्ह आले आहेत. एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर ५१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात आजपर्यंत २०६ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४७५७ झाली असून यापैकी ४४८१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ७० इतकी आहे.
मेशी येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी.
मेशी : देवळा तालुक्यातील मेशी येथे राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून उपसरपंच भिका बोरसे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी आहिरे आणि स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार शिरसाठ यांच्या हस्ते संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी मोतीराम शिरसाठ,शरद सूर्यवंशी,समाधान गरुड, चंद्रशेखर कापसे, लोटन शिरसाठ,सतीश शिरसाठ,गटलू शिरसाठ,नितीन शिरसाठ,समाधान कदम,अभि चव्हाण, खुशाल शिरसाठ,बबलू शिरसाठ, नितीन आहिरे, दीपक सूर्यवंशी, राहुल भुजवा आदी उपस्थित होते.