पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:13 AM2021-04-17T04:13:37+5:302021-04-17T04:13:37+5:30

निवेदनात म्हटले आहे की, नाशिक, मालेगावसह जिल्ह्यात ४५०हून अधिक पेट्रोलपंप आहेत. कोरोनाच्या नियमावलीचे पेट्रोलपंपधारक पालन करत आहेत. शिवाय ...

Demand for vaccination of petrol pump employees | पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची मागणी

पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची मागणी

Next

निवेदनात म्हटले आहे की, नाशिक, मालेगावसह जिल्ह्यात ४५०हून अधिक पेट्रोलपंप आहेत. कोरोनाच्या नियमावलीचे पेट्रोलपंपधारक पालन करत आहेत. शिवाय शासकीय उपक्रमात सहभागी होत असतात. पेट्रोल जीवनावश्यक वस्तू आहे या कोरोना प्रादुर्भावामध्ये जोखीम घेत विक्री व सेवा सुरू ठेवली आहे. मात्र पंपावर इंधन खरेदीसाठी गर्दी होत असते. यात येथील कर्मचाऱ्यांचा थेट ग्राहकांशी संपर्क येतो तसेच मालक व इतर कर्मचारीदेखील गर्दीत संपर्कात येतात. सध्या कोरोनाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे पेट्रोलपंपावरील अनेकांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी संसर्ग होऊन काही जण दगावले आहेत. त्यामुळे सर्व डिलर व कर्मचाऱ्यांना कुठलीही अट न आणता सरसकट लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रसंगी नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले, सचिव सुदर्शन पाटीलसह आदी सदस्य उपस्थित होते.

Web Title: Demand for vaccination of petrol pump employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.