राज्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:54+5:302021-05-29T04:11:54+5:30
राज्य सरकारी कर्मचारी कोविड संसर्ग व लॉकडाऊनच्या काळातही सेवा देत आहेत. विविध विभागातून सेवा देताना हे कर्मचारी कोविडयोद्धा ...
राज्य सरकारी कर्मचारी कोविड संसर्ग व लॉकडाऊनच्या काळातही सेवा देत आहेत. विविध विभागातून सेवा देताना हे कर्मचारी कोविडयोद्धा असल्याने या कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी बससेवेची मागणी
कसबे सुकेणे : नाशिक येथे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या ओझर, कसबे सुकेणे परिसरातील कर्मचाऱ्यांसाठी शहर बससेवा सुरू करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
कसबे सुकेणे, ओझर, दहावा मैल या परिसरातून शेकडो कर्मचारी अत्यावशक सेवेत आहेत. यात सरकारी व निमसरकारी अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, नाशिक मनपाच्या विविध विभागातील कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या बससेवा बंद असल्याने या वर्गाचे हाल होत आहे.