वालदेवी नदीपात्र कोरडेठाक आवर्तनाची मागणी : परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:36 AM2018-05-19T01:36:17+5:302018-05-19T01:36:17+5:30
नाशिकरोड : गेल्या दीड महिन्यापासून वालदेवी नदीपात्रात पाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेठाक झाले आहे.
नाशिकरोड : गेल्या दीड महिन्यापासून वालदेवी नदीपात्रात पाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. नदीकाठच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वालदेवी नदीपात्रात पाण्याचे आवर्तन न सोडल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. काही ठिकाणी खोलगट व खाचखळग्यात डबक्यासारखे पाणी साचून आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याने नागरिकांना डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. कोल्हापूर टाइप बंधाऱ्याची भिंत मोडकळीस आल्याने सर्व पाणी वाहून गेले आहे. जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका कोल्हापूर टाइप बंधारा भिंत बांधण्याचे अथवा दुरुस्त करण्याचे काम एकमेकांवर ढकलत असल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. दीड महिन्यापासून वालदेवीला आवर्तन न सोडल्याने गौळाणे, आंबेबहुला, पाथर्डी, दाढेगाव, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला, विहितगाव, देवळालीगाव येथून वाहणाºया नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.