वीजबिल माफ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 09:44 PM2020-09-03T21:44:18+5:302020-09-04T00:55:28+5:30

चांदवड : वीजबिल माफीसह इतर मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे व तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले.

Demand for waiver of electricity bill | वीजबिल माफ करण्याची मागणी

चांदवड येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारात किसानसभेच्या वतीने धरणे आंदोलन करताना कार्यकर्ते.

Next
ठळक मुद्देशासनाची तुटपुंजी मदत अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही.

चांदवड : वीजबिल माफीसह इतर मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे व तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले.
कोरोना महामारीमुळे शेतकरी, शेतमजूर यांचे खूप हाल होत आहेत. लॉकडाऊन काळात शेतमाल विकला जात नाही, तो शेतातच सडला अथवा नष्ट झाला. कांदा पीककर्ज वेळेवर फेडता येत नाही. शासनाची तुटपुंजी मदत अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. शेतमजुरांची व्यवस्था अतिशय बिकट झाली त्यांचे हाताला काम नाही. रोजगार हमीचे काम गरजवंत व घरी बसलेल्या मजुरांना मिळत नाही. रेशनमधून मिळणारे गहू, तांदूळ, दाळ अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे वितरित केले जात आहे. कोरोना काळात शेती आणि शेतकरी विरोधात काढलेले आदेश ताबडतोब मागे घ्या, रुपये ७५०० दरमहा कोविडसाठी प्रत्येकी कुटुंबाला दहा किलो मोफत धान्य द्या, शेतकरी शेतमजूर कारागिरांना वयांच्या ६० वर्षांनंतर दरमहा रुपये दहा हजार वेतन देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी किसानसभेचे जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे, जिल्हा उपजिल्हाध्यक्ष सुकदेव केदारे, लहानू ठाकरे, रामूतात्या ठोंबरे, छबू पूरकर, रंगनाथ जिरे, नानासाहेब मोरे, अण्णा जिरे, निवृत्ती शिंदे, दशरथ कोतवाल, गणेश मोरे, एकनाथ मोरे, अशोक मोरे, शेख, तुकाराम सावकार आदींसह किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Demand for waiver of electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.