व्याज माफ करण्याची मागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:25 AM2021-02-18T04:25:59+5:302021-02-18T04:25:59+5:30

वाहनचालकांच्या अडवणुकीची तक्रार नाशिक : नाशिक परिवहन कार्यालयात असलेल्या स्वयंचलित वाहन चाचणी व परीक्षण केंद्राकडून वाहनचालकांची अडवणूक केली केली ...

Demand for waiver of interest | व्याज माफ करण्याची मागण

व्याज माफ करण्याची मागण

Next

वाहनचालकांच्या अडवणुकीची तक्रार

नाशिक : नाशिक परिवहन कार्यालयात असलेल्या स्वयंचलित वाहन चाचणी व परीक्षण केंद्राकडून वाहनचालकांची अडवणूक केली केली जात असल्याची तक्रार भद्रकाली ऑटो रिक्षा युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. या केंद्राकडून आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोपही परिवहनमंत्री, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

पेट्रोलचे दर कमी करण्याची मागणी

नाशिक : दिवसागणिक वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी शहरातील भद्रकाली ऑटो रिक्षा युनियनच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. पेट्रोल दरवाढीमुळे अनेक रिक्षा, टॅक्सीचालकांना व्यवसाय करणे अवघड झाले असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरवाढ कमी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पंचवटी वाचनालयात आदरांजली कार्यक्रम

नाशिक : पंचवटी सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्व. ॲड. उत्तमराव ढिकले यांची ८१वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. के. मुखेडकर होते. नथूजी देवरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रतिमापूजन करण्यात आले. मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमास परिसरातील नागरिक व वाचनालयाचे सभासद उपस्थित होते.

दिव्यांगांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण

नाशिक : महराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या वतीने राज्यातील दिव्यांगांना विनामूल्य रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांंग व्यक्तींनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. िद. २८ फेब्रुवारीपर्यंत लिंक सुरू राहणार आहे. इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक अमावस्थेला अन्नदान

नाशिक : श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने शिवप्रसाद शास्त्री यांच्या मर्गदर्शनाखाली पंचवटी येथे प्रत्येक अमावस्येला अन्नदान व तर्पण विधी कार्यक्रम संपन्न झाला. राज्यातील अनेक भाविक ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी गुरुवर्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ३०० भाविकांना अन्नदान करण्यात आले.

उपनगरला कमी दाबाने पाणी

नाशिक : शहरातील उपनगर परिसरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Demand for waiver of interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.