राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 07:34 PM2021-08-10T19:34:18+5:302021-08-10T19:35:03+5:30
मानोरी : राज्यातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क माफ करावे तसेच रखडलेली पोलीस भरती तात्काळ सुरू करण्याची मागणी लासलगाव अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष कलीम पठाण यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्यात आले. तसेच याच काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगल्या प्रकारे भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून गेले असून ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून शेतकरी वर्गाला दिलासा देणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच रखडलेली पोलीस भरती देखील तात्काळ सुरू करावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.