दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:55 AM2018-11-12T00:55:33+5:302018-11-12T00:55:56+5:30
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना ते तत्काळ परत करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपविभागीय कार्यालयात निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
नाशिक : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना ते तत्काळ परत करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपविभागीय कार्यालयात निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात यावर्षी पर्जन्यवृष्टी कमी झाल्यामुळे दुष्काळाची स्थिती असल्याने राज्यातील १८० तालुक्यांतील विद्यार्थ्यांची शुल्क माफ करण्याची मागणी अभाविपने केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे त्यांना ते शुल्क प्रक्रिया राबवून तत्काळ परत करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचे बाकी आहे त्यांच्याकडून परीक्षा शुल्क विद्यापीठाने आकारू नये तसेच आदेश आपण संलग्नित महाविद्यालयांना द्यावेत, अशा मागण्या अभाविपने निवेदनाच्या माध्यमातून केल्या
आहेत.
यावेळी अभाविपचे महानगरमंत्री प्रथमेश नाईक, जिल्हा संयोजक सागर शेलार, नितीन पाटील, सौरभ धोत्रे, सौरभ जोशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना ते तत्काळ परत करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपविभागीय कार्यालयात निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात यावर्षी पर्जन्यवृष्टी कमी झाल्यामुळे दुष्काळाची स्थिती असल्याने राज्यातील १८० तालुक्यांतील विद्यार्थ्यांची शुल्क माफ करण्याची मागणी अभाविपने केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे त्यांना ते शुल्क प्रक्रिया राबवून तत्काळ परत करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचे बाकी आहे त्यांच्याकडून परीक्षा शुल्क विद्यापीठाने आकारू नये तसेच आदेश आपण संलग्नित महाविद्यालयांना द्यावेत, अशा मागण्या अभाविपने निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहेत. यावेळी अभाविपचे महानगरमंत्री प्रथमेश नाईक, जिल्हा संयोजक सागर शेलार, नितीन पाटील, सौरभ धोत्रे, सौरभ जोशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.