पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 02:18 PM2018-10-24T14:18:11+5:302018-10-24T14:18:41+5:30

खर्डे : येथे गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता येथील वाशीं धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावे तसेच धरणातील अवैध पाणी उपसा त्वरित थांबविण्यात यावा असा ठराव येथील ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आला.

Demand for water for drinking water | पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याची मागणी

पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याची मागणी

Next

खर्डे : येथे गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता येथील वाशीं धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावे तसेच धरणातील अवैध पाणी उपसा त्वरित थांबविण्यात यावा असा ठराव येथील ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आला. खर्डे येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच विमलबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ग्रामसभेत सन २०१८-१९ करिता गाव विकास आराखडा तयार करण्यासाठी चर्चा झाली . यावेळी करावयाचे कामे सुचविण्यात येऊन ठराव करण्यात आला. नविन स्मशानभूमीत अंत्यसंस्कारविधी न करता कोलथी नदीत असलेल्या जुन्याच स्मशानभूमीत परंपरागत सुरू असलेला अंत्यविधीचा सोपस्कार करण्यात यावा.याविषयावर दोन्ही स्मशानभूमीजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये ग्रामसभेत वादळी चर्चा झाली. यानंतर मुलूखवाडी गावात नवीन स्मशानभूमी बांधण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली.याठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने आहे, त्याच जागेवर नवीन स्मशानभूमीचे बांधकाम करण्याचे ठरविण्यात आले . परिसरात नवीन वीज उपकेंद्रांसाठी ना हरकत दाखला , बाजार पट्टीच्या जागेवर लवकरच विविध कामे पूर्ण करण्यात येणार असल्यामुळे त्या जागेवर कोणीही नवीन अतिक्र मण करू नये. आहे ती अतिक्र मणे लवकरच हटविण्यात येऊन ग्रामपंचायत नवीन गाळे तयार करणार आहे.यावर्षी पावसाने ओढ दिल्याने नदी नाले कोरडी ठाक पडल्याने विहिरींना तळ गाठला आहे . यामुळे परिसरात चाºयाचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावू नये यासाठी वार्शी धरणातील पाणी आरक्षित करण्यात येऊन धरणातील अवैध पाणी उपसा बंद करण्यात यावा ,असा एकमुखी ठराव संमत करण्यात आला. ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली . यावेळी उपसरपंच प्रमिला जगताप ,सदस्य गोकुळ जगताप,नानाजी निकम, मीराबाई मोरे, बायजबाई शिंदे , ज्योती आहिरे , राहुल देवरे ,वंदना पवार ,शिंधुबाई पवार, तुळसाबाई माळी , आदींसह माजी सरपंच नारायण जाधव ,जगन माळी ,विजय जगताप ,गिरीश पवार , पोलीस पाटील भारत जगताप ,भरत देवरे ,नानाजी मोरे, गोरख आहिरे , दौलत भामरे ,अनिल पवार ,बाजीराव मोरे, विष्णू पवार ,कैलास देवरे ,केशव देवरे ,राजाराम गांगुर्डे , ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदींसह वैद्यकीय अधिकारी डॉ अलका सपकाळे , अंगणवाडी सेविका, मदतनीस , आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते .

Web Title: Demand for water for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.