गिरणा नदीला पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 05:00 PM2019-05-18T17:00:04+5:302019-05-18T17:00:18+5:30
पाणीटंचाई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदन
खर्डे : देवळा तालुक्यातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता गिरणा नदीला तात्कळ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, देवळा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. गिरणा नदीला पाणी नसल्याने नदीच्या परिसराबरोबरच गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजना पूर्णत: ठप्प आल्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. देवळा तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता गिरणा नदीला तात्काळ पाणी सोडणे आवश्यक असून गिरणा नदीला दोन दिवसात पाणी न सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, प्रांतिक सदस्य योगेश आबा आहेर , राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा उषाताई बच्छाव, शहराध्यक्ष जितेंद्र आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निखिल आहेर, तालुकाध्यक्ष सुनील आहेर, कृष्णा अहिरे, राजेश आहेर, सचिन सूर्यवंशी, अनिल पवार, यज्ञेश रौंदळ आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.