चास येथे टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 03:28 PM2019-05-30T15:28:19+5:302019-05-30T15:32:36+5:30
नांदूरशिंगोटे: सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या चास गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
नांदूरशिंगोटे: सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या चास गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. भोजापूर धरण उशाशी असताना गावाचा घसा कोरडा पडला आहे. गावात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी सरपंच नंदाताई भाबड यांनी पंचायत स्तरावर केली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीने तळ गाठल्याने पाणी पुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहे. गावापासून जाणाºया म्हाळुंगी नदीजवळ स्थानिक पाणीपुरवठा योजनेची विहिंर आहेत. त्यातूनच गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. परंतू यावर्षी सर्वत्र दुष्काळी स्थिती असल्याने बागायती क्षेत्रात सुध्दा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षात भोजापूर खोºयात पाणी प्रश्न बिकट झाला आहे. या भागात विहिरींनी तळ गाठल्याने अर्धातास सुध्दा विद्युतपंप चालत नाही. भोजापूर धरणाच्या क्षेत्रात गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहिली नसल्याने पाणी पुरवठा करणाºया विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे विहिरीत पाणी आल्यानतंर तीन ते चार दिवसांनी गावाला पंधरा ते वीस मिनिटे पाणी पुरवठा केला जातो. चास गावात तीन ते साडेतीन हजार लोकसंख्या असल्याने सदरचा पाणीपुरवठा गावाला अपुरा पडत आहे. त्यामुळे पावसाचे माहेरघर असलेल्या भागात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.