धुळगावला नळाद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 04:09 PM2019-07-01T16:09:30+5:302019-07-01T16:09:48+5:30
ग्रामस्थांचे निवेदन : परिसरात पाणी व चारा टंचाई
जळगाव नेऊर : धुळगाव येथील वाडी वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करून नळाद्वारे पाणी देण्याची मागणी धुळगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सोमनाथ वडित्के यांना ग्रामस्थांच्या वतीने कॉग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, मागील वर्षापासुन परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून चालु खरीप हंगाम सुरु आहे परंतु अजुनही चांगल्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने वाडी वस्त्यावर पाईपलाईन करु न नळाद्वारे पाणी द्यावे व गावाचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रसंगी नारायण मोरे, वाल्मीक गायकवाड, बाबुराव मांजरे, युवराज गायकवाड ,ज्ञानेश्वर भोसले, अशोक गायकवाड, सोमनाथ गायकवाड आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.