ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 10:41 PM2019-11-07T22:41:16+5:302019-11-07T22:42:23+5:30
संगमेश्वर : राज्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने मालेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मालेगाव तालुक्यातील साकुरी (निं) येथे परतीच्या पावसामुळे नदी, शेती व नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमेश्वर : राज्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने मालेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या वर्षी राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. परिणामी शेतकºयांच्या हातातोंडाचा घास गेला आहे. पावसाने शेत शिवारातील पिके वाहून गेली.
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळात होरपळलेल्या बळीराजाला यंदा उद्ध्वस्त केले. सतत अवर्षणग्रस्त असलेल्या मालेगाव तालुक्यातील शेतकºयांच्या सद्यस्थितीत ऐन दिवाळीत तीन शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या.
शेतीवरच उदरनिर्वाह असल्याने शासनाने तात्काळ मालेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना दिलासा द्यावा. त्वरित नुकसानभरपाई द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विलास वडगे, तालुकाध्यक्ष विकास मंडळ, जिल्हा संघटक रविराज सोनार, सुधीर साळुंखे, नचिकेत कोळपकर, स्वाती वाणी, जयेश शेलार, प्रवीण वाणी, आबा गायकवाड, अशोक पठाडे, राजीव वडगे, प्रवीण गायकवाड, सारंग पाठक, अन्वर पठाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.