येवला-मनमाड रस्ता दुरूस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 02:50 PM2020-08-06T14:50:38+5:302020-08-06T14:51:37+5:30
येवला : येवला- मनमाड राज्य महामार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे. अनकाई ते बाभूळगांव या दरम्यान रस्त्यावर तर मोठमोठे खड्डे झालेले असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक बळीही गेले आहेत. सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात अशी मागणी पंचायत समतिीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनादद्वारे केली आहे.

मालेगांव- मनमाड- येवला- कोपरगांव हा राज्य महामार्ग अत्यंत वर्दळीचा व महत्वपुर्ण महामार्ग आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने रस्त्याच्या दुरावस्थेमुळे, अपघातात वाढ होवून मोठया प्रमाणात जीवीत हानी झाली आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर रस्त्याची तातडीने सुधारणा करण्यात यावी व जोपावेतो सुधारणा होत नाही तो पावेतो कोणतीही टोलवसूली करण्यांत येवू नये अशी मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे.
मनमाड- येवला रस्त्याचे काम खाजगी कपंनीस वापरा आण िहस्तांतरीत करा तत्वावर दिलेले आहे. मात्र, सन २०१० पासून कंपनीने सदर रस्त्याच्या दुरूस्ती व सुधारणेकडे दुर्लक्ष केलेले असून जी दुरूस्ती वा सुधारणा झाी त्याचा दर्जा राखला गेलेला नाही. गेल्या मिहन्यात सदर रस्त्यावर येवला- मनमाड मार्गावर १७ ते १८ अपघाताची नोंद झाली आहे. अनकाई ते बाभूळगांव दरम्यान असणाऱ्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे अपघात होवून अनेक माणसेही जीवानीशी गेली आहे. याबाबत सातत्याने केलेल्या तक्र ारीची प्रशासन दखल येत नसल्याने, जनिहतासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवार, (दि.१६) रोजी सावरगांव चौफुलीवर सकाळी दहा वाजता धरणे आंदोलन सुरू करणार असल्याचे सदर निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. भारती पवार, बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आदींना पाठविण्यात आल्या आहेत.