धार्मिक कार्यक्र मांना परवानगी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 17:23 IST2020-08-31T17:19:26+5:302020-08-31T17:23:03+5:30
पेठ : गत सहा महिन्यापासून कोरोनामुळे लॉक डाऊन असल्याने बंद करण्यात आलेले धार्मिक कार्यक्र म सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

पेठ तालुक्यात धार्मिक कार्यक्र मांना परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार संदिप भोसले यांना देतांना धर्मराज चौधरी, रामदास वाघेरे, तात्याबा राऊत, नरेंद्र गायकवाड आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : गत सहा महिन्यापासून कोरोनामुळे लॉक डाऊन असल्याने बंद करण्यात आलेले धार्मिक कार्यक्र म सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
पेठ तालुका कार्यकारिणीच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांना निवेदन देण्यात आले. लॉक डाऊन शिथील झाल्यानंतर शासनाने टप्प्या टप्प्याने व्यवहार सुरू केले आहेत. मात्र लॉक प्रक्रि येत तालुक्यातील मंदिरे, समाजमंदिरे व सार्वजनिक ठिकाणी योग्य शारिरीक अंतर व नियमांचे पालन करून भजन, प्रवचन, किर्तन आदी धार्मिक कार्यक्र मांना परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोना सारख्या साथीच्या रोगाला अटकाव करण्यासाठी धार्मिक कार्यक्र मातून जनजागृती करण्याचे आश्वासन यावेळी वारकरी मंडळाच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष धर्मराज चौधरी, रामदास वाघेरे, नरेंद्र गायकवाड, तात्याबा राऊत यांचे सह वारकरी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.