दणका मोर्चानंतर मागण्यांची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 06:24 PM2018-08-08T18:24:04+5:302018-08-08T18:24:59+5:30

एकलव्य संघटना : प्रांताधिका-यांनी घेतली बैठक

The demands of the post after the dock morch | दणका मोर्चानंतर मागण्यांची दखल

दणका मोर्चानंतर मागण्यांची दखल

Next
ठळक मुद्देएकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवाजीराव ढवळे यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी भिमराज दराडे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.बैठकीत जातीचे दाखले, नविन रेशन कार्ड देण्याच्या सूचना प्रांत दराडे यांनी देत वनजमिनींची दावे लवकर निकाली काढण्यात येतील, असे स्पष्ट केले

नांदगाव : नांदगाव तहसिल कार्यालयावर एकलव्य संघटनेचे वतीने विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या दणका मोर्चाची दखल घेऊन एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवाजीराव ढवळे यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी भिमराज दराडे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
आदिवासी समाजाला जातीचे दाखले तत्काळ द्यावे, नवीन कुटुंबांना रेशनकार्ड द्यावे, वनजमिनचे दावे मंजूर करावे, गायरान जमिनी कसणा-या आदिवासी बांधवांच्या नावे कराव्यात, आदिवासींना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करु न द्यावी, आदी मागण्यांसाठी नांदगाव तहसिल कार्यालयावर एकलव्य संघटनेच्या वतीने दणका मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची दखल घेऊन प्रविण गायकवाड यांच्याशी संपर्कसाधून प्रांताधिकारी भिमराज दराडे यांनी येवला येथे आदिवासी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जातीचे दाखले, नविन रेशन कार्ड देण्याच्या सूचना प्रांत दराडे यांनी देत वनजमिनींची दावे लवकर निकाली काढण्यात येतील, असेही स्पष्ट केले. बैठकीत ब-याचशा मागण्या मार्गी लागल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले. बैठकीस एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे सोनवणे, सुधाकर वाघ, नांदगाव तालुकाध्यक्ष बापु पवार, वैभव सोनवणे, राजेंद्र पिंपळे, संतोष निकम, खंडू बहिरम, अरु ण मोरे, संपत पवार, अस्मिता पवार, अरविंद पवार, रमेश पवार, शिवा माळी, रमेश दळवी, रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: The demands of the post after the dock morch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक