अहिवंतवाडी ते पिंपरी अंचला हा रस्ता दुरु स्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:35 PM2019-09-26T22:35:22+5:302019-09-26T22:35:52+5:30
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी ते पिंपरी अंचला रस्त्याच्या त्वरीत दुरु स्ती करण्याची मागणी अहिवंतवाडीच्या सरपंच निर्मला गवळी यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी ते पिंपरी अंचला रस्त्याच्या त्वरीत दुरु स्ती करण्याची मागणी अहिवंतवाडीच्या सरपंच निर्मला गवळी यांनी केली आहे.
अिहवंतवाडी ते पिंपरी अंचला हा रस्ता सन २०१६/१७ मध्ये अतिवृष्टीने संपूर्ण रस्त्यावरील सात माऱ्या व पुल वाहून गेले होते. परंतू गेल्या तिन वर्षापासून या रस्त्यावर सार्वजनिक विभागा मार्फत तात्पुरती डागडूगीचे काम करु न सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळ मारून नेल्याने सार्वजनिक विभागाच्या कारभाच्या कारभारावर नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्यावेळी पावसामुळे चार ते पाच ठिकाणी रस्ता व मोऱ्यांना मोठे भगदाड पडले होते. त्या ठिकाणी माती मीश्रीत मुरूम टाकून रस्ता दुरु स्त केला परंतू परिसरात जोरदार पाऊस होत असल्यामुळे स्लॅपच्या मोºया टाकाव्यात अशी मागणी परिसरातील नागरीक करीत आहेत.
पण ज्या ठिकाणी कच्चा भराव टाकला त्या ठिकाणी ग्रामस्थांना जिव मुठीत धरून प्रवास लागत आहे. वाजुळपाडा ते अिहवंतवाडी फाटा या रस्त्यावर पायी चालणे सुध्दा अवघड झाले आहे. आता या रस्त्यावरून बळीराजाला आपला शेतातील टमाटा विक्र ीसाठी वणी किंवा खोरी फाटा या ठीकाणी घेवून जातांना शेतकºयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
जरी दोन्ही बाजुने वाहन आले तर लहान फरशी पुलावर तुटल्यामुळे गाडी काढता येत नाही तसेच अिहवंतवाडी ते पिंपरी अंचला या रस्त्यामुळे साडेतिन शक्ती पिठापैकी आदय पिठ म्हणजे सप्तश्रृंगी गडावर जाणार्या भाविकांना ही दहा ते पंधरा किलोमिटर अंतर कमी होणार आहे म्हणून अिहवंतवाडी ते पिंपरी अंचला या रस्त्यावर कोल्हेरच्या अमरधाम जवळ एक छोटा पुल बांधावा तसेच वांजुळ पाडा ते अिहवंतवाडी फाटा या चार किमीवर तिन छोटे पुल टाकावेत व रस्ता त्वरीत दुरु स्त करावा अशी मागणी आहिवंतवाडी परिसरातील ग्रामस्थ यांनी केली आहे.