भगूर येथील स्मशानभूमीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:32 AM2017-08-27T00:32:28+5:302017-08-27T00:32:33+5:30
येथील स्मशानभूमीत अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरल्याने त्या ठिकाणी नगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
भगूर : येथील स्मशानभूमीत अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरल्याने त्या ठिकाणी नगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे. भगूर नगरपालिकेला २० वर्षांपूर्वी डॉ. सी. जे. लकारिया परिवाराने स्मशानभूमी बांधून दिली होती. नगरपालिका स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने सर्वत्र झाडे-झुडपे वाढली असून, अस्वच्छता पसरली आहे. मोकाट जनावरांचा त्या ठिकाणी वावर वाढल्याने अस्वच्छतेत भर पडत आहे. त्याठिकाणी असलेल्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाºयाला इतरत्र काम देण्यात आल्याने स्मशानभूमीच्या दुरवस्थेत आणखीनच भर पडली आहे. स्वच्छता कर्मचाºयांची रिकामी खोली ही टवाळखोर व मद्यपींचा अड्डा झाली आहे. भगूर नपाने स्मशानभूमीची डागडुजी व रंगरंगोटी करून परिसरात स्वच्छता करावी, अशी मागणी माजी नगरसेवक शरद उबाळे, नरेश गायकवाड, कैलास यादव, विलास भवार, बाळासाहेब मोरे, विलास यादव, संतोष भालेराव, कैलास सुरवाडे, श्रावण निकम, दिलीप जाधव आदींनी केली आहे.