देमको बँकची निवडणूक पहिल्यांदा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 01:33 AM2022-03-10T01:33:32+5:302022-03-10T01:34:05+5:30

वळा मर्चंट को-ऑप. बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत बुधवारी (दि. ९) माघारीच्या दिवशी दोन्ही पॅनलमध्ये समझोता होऊन १२/५ या जागावर सहमती घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यात आली. बिनविरोध निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार करण्यात येऊन समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतशबाजी करून एकच जल्लोष केला.

Demko Bank election unopposed for the first time | देमको बँकची निवडणूक पहिल्यांदा बिनविरोध

देवळा मर्चंट बँकेचे बिनविरोध निवड झालेले उमेदवार हात उंचावून जल्लोष करताना.

Next

देवळा : येथील देवळा मर्चंट को-ऑप. बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत बुधवारी (दि. ९) माघारीच्या दिवशी दोन्ही पॅनलमध्ये समझोता होऊन १२/५ या जागावर सहमती घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यात आली. बिनविरोध निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार करण्यात येऊन समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतशबाजी करून एकच जल्लोष केला.

देवळा मर्चंट बँकेचे विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश कोठावदे व नितीन शेवाळकर यांचे पॅनल समोरासमोर उभे ठाकले असतांना संस्थेला निवडणुकीच्या खर्चापासून वाचविण्यासाठी दोन्ही पॅनलच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन योग्य तोडगा काढत कोठावदे पॅनलचे १२ तर शेवाळकर गटाचे पाच असे सर्व १७ उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले.

 

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे -

 

राजेंद्र सूर्यवंशी, राजेश मेतकर, जयप्रकाश कोठावदे, योगेश वाघमारे, केदारनाथ मेतकर, अनिल धामणे, भगवान बागड, मयूर मेतकर, हेमंत अहिरराव, प्रमोद शेवाळकर, योगेश राणे, डॉ. प्रशांत निकम, कोमल कोठावदे, नलिनी मेतकर, मनीषा शिनकर, सुभाष चंदन, अमोल सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली.

 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सुजय पोटे यांनी काम पाहिले. त्यांना सहकार अधिकारी अनिल पाटील यांनी सहाय्य केले.

चौकट...

६२ वर्षात पहिल्यांदा बिनविरोध निवड

देवळा मर्चंट बँकेची स्थापना १९ जानेवारी १९६१ साली झाली. ६२ वर्षांच्या इतिहासात या बँकेची पंचवार्षिक निवडणूक पहिल्यांदा बिनविरोध झाली. व्यापारी बँक असून, तिचे जिल्हा कार्यक्षेत्र आहे. सभासदांनी बँकेचे आर्थिक हित लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

 

Web Title: Demko Bank election unopposed for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.