लोकशाही दिनाच्या तक्रारी व्हॉट्सॲपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:11 AM2021-07-03T04:11:07+5:302021-07-03T04:11:07+5:30

लोकशाही दिनासाठीचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर सादर करावे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ...

Democracy Day complaints on WhatsApp | लोकशाही दिनाच्या तक्रारी व्हॉट्सॲपवर

लोकशाही दिनाच्या तक्रारी व्हॉट्सॲपवर

Next

लोकशाही दिनासाठीचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर सादर करावे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महिन्याच्या पहिल्या सोमवारी ५ जुलै रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही. त्याऐवजी लोकशाही दिनासाठीचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ९४२१९५४४०० या व्हॉट्सॲप क्रमांकावर सादर करण्याचे आवाहन महसूल विभागाचे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले आहे.

कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर अथवा टपालाद्वारे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नागरिकांनी तक्रार अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे. निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असावे, असेही कळविण्यात आले आहे. लोकशाही दिनासाठी न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व किंवा अपील्स, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही तहसीलदार नजन यांनी पत्रकाच्या माध्यमातून कळविले आहे.

Web Title: Democracy Day complaints on WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.