नाशकात मुख्यंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन ; शिक्षकांवरील लाठीराच्या निषेधार्थ छात्रभारतीची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 05:29 PM2019-08-27T17:29:57+5:302019-08-27T17:31:42+5:30

मुंबईत विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्याचे पडसाद नशिकमध्येही उमटले असून नाशिकमध्ये छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिक्षकांवरील  लाठिमाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२७) हुतात्मा स्मारकाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून आंदोलन केले. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नसतानाही छात्रभारतीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुतळा जाळून घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी आंदोलकांपैकी चौगांना ताब्यात घेतले आहे.

 Demolition of Chief Minister's statue in Nashik - Students declare protest against student's stick | नाशकात मुख्यंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन ; शिक्षकांवरील लाठीराच्या निषेधार्थ छात्रभारतीची घोषणाबाजी

नाशकात मुख्यंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन ; शिक्षकांवरील लाठीराच्या निषेधार्थ छात्रभारतीची घोषणाबाजी

Next
ठळक मुद्देछात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी शिक्षकांवरील लाठीमाराचा छात्रभारतीकडून निषेध

नाशिक: मुंबईत विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्याचे पडसाद नशिकमध्येही उमटले असून नाशिकमध्ये छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिक्षकांवरील  लाठिमाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२७) हुतात्मा स्मारकाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून आंदोलन केले. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नसतानाही छात्रभारतीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुतळा जाळून घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी आंदोलकांपैकी चौगांना ताब्यात घेतले आहे. 
मुंबईसह राज्यातील अनेक शिक्षक संघटनांचे गेल्या १४ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने त्यांच्या मागण्यांविषयी ठोस आश्वासन न दिल्याने सोमवारी संघटनेने आक्रमक पवित्रा धारण केला. १०० टक्के अनुदानाशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा देत शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ च्या  मोर्चा वळविला. त्या वेळी पोलिसांनी त्यांना रोखले असता शिक्षक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. आझाद मैदानात निर्माण झालेल्या या तणावाच्या परिस्थितीनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीमार केले.  या घटनेचा राज्यभरात निषेध होत असताना पोलिसांनी शिक्षकांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ नाशिकमध्येही मंगळवारी छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फेफडणवीस यांच्या पुतळ््याचे दहन करून आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नसतानाही छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करू न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळयाचे दहन केले.त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांपैकी छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष समाधान बागूल, राज्य सदस्य राकेश पवार, राम सूर्यवंशी व सदाशीव गणगे या  चौघांना ताब्यात घेतले असून सायंकाळी उशीरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

Web Title:  Demolition of Chief Minister's statue in Nashik - Students declare protest against student's stick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.