मालेगावी ममता रुग्णालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:35+5:302021-07-20T04:11:35+5:30
तालुक्यातील रावळगाव येथील सविता खरे या महिलेला प्रसूतीसाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीनंतर या महिलेची प्रकृती ...
तालुक्यातील रावळगाव येथील सविता खरे या महिलेला प्रसूतीसाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीनंतर या महिलेची प्रकृती खालावली. त्यातच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे सविता खरे हिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी सोमवारी रुग्णालयात गोंधळ घालीत रुग्णालयाची तोडफोड केली. या घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव, लता दोंदे, छावणीचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, किल्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक देशमुख व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त नातेवाइकांनी डॉक्टरांवर अटकेची कारवाई करावी, अशी मागणी केली. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. उत्तरीय चाचणीनंतरच्या अहवालात संबंधित रुग्णालयाचे डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भूमिका पोलीस प्रशासनाने घेतली. रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. याप्रकरणी प्रारंभी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
फोटो फाईल नेम : १९ एमजेयुएल ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव-सटाणारोडवरील ममता रुग्णालयात तोडफोड झाल्यानंतर प्रवेशद्वारावर पोलीस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव व कर्मचाऱ्यांनी लावलेला बंदोबस्त.
फोटो फाईल नेम : १९ एमजेयुएल ०३ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी बाळंतिणीच्या मृत्यूनंतर ममता रुग्णालयाबाहेर नातेवाइकांनी केलेली गर्दी.
190721\19nsk_29_19072021_13.jpg~190721\19nsk_30_19072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहे.~फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहे.