कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:11 PM2017-12-19T15:11:21+5:302017-12-19T15:12:00+5:30
कनाशी : नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११.३० वाजेपासून नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे, सचिव प्रा. अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य व नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक धरणे आंदोलनात सहभागी होते.

यावेळी जिल्ह्यातील उपस्थित प्राध्यापकांना मागण्यांबाबत शिंदे यांनी मार्गदर्शन केले व मागण्या लवकर मान्य न झाल्यास १८ जानेवारीला विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल याबाबतची रु परेषा सांगितली.त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव व एचएससी बोर्डाचे सचिव आर. आर. मारवाडी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
प्रमुख मागण्यांमध्ये कायम विना अनुदान तत्वावरील मुल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना त्वरीत अनुदान द्यावे, आॅनलाईन संच मान्यतेतील त्रूटी दुर करून प्रचलित निकषांनुसार संच मान्यता करणे, २ मे २०१२ पासून नियुक्त शिक्षकांना मान्यता व वेतन देणे, दि १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असलेल्याना जुनी पेंशन योजना लागु करणे, माहिती व तंत्रज्ञान विषय अनुदानित व अनिवार्य करणे, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रशासन स्वतंत्र करणे, २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी देणे, ४२ दिवसांच्या संपकालीन रजा पुर्ववत खात्यात जमा करणे वैद्यकीय खर्च पूर्तीसाठी कॅशलेस प्रणाली सुरू करणे, यापूर्वी नियुक्त शिक्षकांना अभियोग्यता चाचणीत सुट देणे, गणित व विज्ञानाचे भाग-१ व भाग-२ असे २ स्वतंत्र पेपर सुरु करणे, अभियांत्रिकी, वैद्यकीय व औषधनिर्माण प्रवेशासाठी १२ वी बोर्डाच्या गुणांना ५० टक्के वेटेज देणे व इतर अन्य ३२ मागण्यांचे निवेदन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. आर. एन. शिंदे, प्रा. डी. जे. दरेकर, प्रा. डी. एम. कदम, प्रा. राजु पाळेकर, प्रा. एम. पी गायकवाड, प्रा. टी. एस. ढोली, प्रा. बी. पी. दवंगे, प्रा. आर. एन. निकम, प्रा. आर. बी. धनवटे,. प्रा शेवाळे , प्रा. व्ही. एम. चव्हाण, प्रा. पी. आर. पवार, प्रा. ए. टी. पवार, श्रीमती एम. डी. निचळे यांच्या हस्ते जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.