येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:49 AM2018-08-15T01:49:25+5:302018-08-15T01:51:36+5:30
शहरातील विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १४) संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ जाहीर निदर्शने करण्यात आली.
येवला : शहरातील विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १४) संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ जाहीर निदर्शने करण्यात आली. यावेळी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास शहर काजी रफीउद्दीन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहराध्यक्ष अजहर शेख यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी भीमस्मरण व भीमस्तुती घेण्यात आली. त्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. निदर्शने करून नंतर सभेत रूपांतर झाले. यावेळी अजिज शेख, प्रा. अर्जुन कोकाटे, शशिकांत जगताप, दौलत गाडे, रेखा साबळे, आशा आहेर, रंजना पठारे यांनी आपल्या भाषणातून सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी तालुकाध्यक्ष पगारे म्हणाले, संविधान जाळणे म्हणजेच लोकशाहीला जाळणे, लोकांच्या मनात विष पेरणाऱ्या देशद्रोहांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचे भारतीयत्व रद्द करा, अशी मागणी पगारे यांनी केली. यावेळी विधाता आहिरे, दत्तू वाघ, अहमजा मन्सुरी, आकाश घोडेराव, बाळू सोनवणे, बाळू आहिरे, विनोद त्रिभुवन, वसंत घोडेराव, सुरेश धिवर, संतोष वाघ, कांतिलाल पठारे, राजेंद्र गायकवाड, श्रीधर आहिरे, कांताबाई गरु ड, शोभा उबाळे, शोभा घोडेराव आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.