दोडीत बिजप्रक्रियेचे शेतकऱ्यांना प्रात्याक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 07:13 PM2018-08-12T19:13:31+5:302018-08-12T19:23:15+5:30

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे कृषीकन्यांनी शेतकºयांसाठी विविध शेतीविषयक प्रात्याक्षिके करून दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आले.

Demonstrating farmers in the tactical biology process | दोडीत बिजप्रक्रियेचे शेतकऱ्यांना प्रात्याक्षिक

दोडीत बिजप्रक्रियेचे शेतकऱ्यांना प्रात्याक्षिक

Next
ठळक मुद्दे जैविक खताच्या मदतीने सोयाबीन पिकाच्या बियाणावर बिजप्रक्रिया करण्यात आली.

 



नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे कृषीकन्यांनी शेतकºयांसाठी विविध शेतीविषयक प्रात्याक्षिके करून दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सेवा संस्कार संस्थेचे कृषी महाविद्यालय मालदाड येथील कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबविण्यात आला. कृषीकन्यांनी प्रात्यक्षिकात जैविक खताच्या मदतीने सोयाबीन पिकाच्या बियाणावर बिजप्रक्रिया करण्यात आली. यामध्ये २५ ग्रॅम रायजोबीयम जैविक खत, १२.५ ग्रॅम गुळ आणि १ किलो सोयाबीन बियाणे वापरण्यात आले. त्यानंतर जैविक खत व गुळाचे द्रावण बियाणाला चोळण्यात आले. या बिजप्रक्रिया मुळे जिवाणुजन्य आणि किटकजन्य रोगांपासुन पिकांचे संरक्षण होते व त्यामुळे पीकांची वाढ चांगल्या प्रमाणात होते. कृषीकन्यांनी शेतकºयांना या पध्दतीने बिज प्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्रात्यक्षिका दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते. वर्षा भोपळे, प्रतिक्षा खरात, प्राजक्ता घोगरे, मधुबाला आहेर, कल्याणी जगताप, सायली अमोलीक या कृषीकन्यांनी शेतकºयांना माहिती दिली. कृषीकन्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. पांडे, उपप्राचार्य डॉ. ए.एल. हारदे, प्राध्यापक एस.पी. घुले, पुजा राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Web Title: Demonstrating farmers in the tactical biology process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक