स्वयंचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 06:33 PM2019-07-25T18:33:28+5:302019-07-25T18:34:11+5:30

पारंपरिक शेतीच्या मशागतीला फाटा देत आदिवासी बळीराजाने नव्या कृषी तंत्रज्ञानाची कास धरली असून, भात लावणीच्या कष्टाच्या कामातून मजुरांची सुटका करत स्वयंचलित भात लावणी यंत्राचा वापर केला जाऊ लागला आहे.

Demonstration of automatic paddy planting machine | स्वयंचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

हरणगाव, ता. पेठ येथे स्वयंचलित यंत्राद्वारे भात लावणी प्रात्यक्षिक करून दाखवताना शेतकरी .

Next
ठळक मुद्देकृषी तंत्रज्ञान : शेतकऱ्यांची वेळ व पैशाची बचत

पेठ : पारंपरिक शेतीच्या मशागतीला फाटा देत आदिवासी बळीराजाने नव्या कृषी तंत्रज्ञानाची कास धरली असून, भात लावणीच्या कष्टाच्या कामातून मजुरांची सुटका करत स्वयंचलित भात लावणी यंत्राचा वापर केला जाऊ लागला आहे.
पेठ तालुक्यात बहुतांश भात व नागली पिके घेतली जात असून, भात पिकाची पेरणीपासून तर लावणीपर्यंत मशागत करावी लागते. या तंत्रज्ञानामुळे गुडघाभर चिखलात भाताची लावणी करण्यापासून मजुरांची सुटका झाली असून, वेळ व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी शीलानाथ पवार यांनी आदिवासी शेतकºयांना सकारात्मक ऊर्जा देत आधुनिक शेतीकडे आकर्षित केले. हरणगाव येथे प्रत्यक्ष शेतात भात लावणीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात
आले.
याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ, उपविभागीय अधिकारी संजय सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, मंडल कृषी अधिकारी श्रीरंग वाघ, एम. बी. महाजन, कार्यालयीन कृषी अधिकारी संजय पवार, शेतकरी रघुनाथ जाधव, नंदू बदादे, अंबादास भोये, नामदेव भोये, जगन जाधव, रवि जाधव, शिवाजी जाधव, पोलीसपाटील निवृत्ती पवार, सरपंच मनमोहन जाधव, प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण टोपले, कृषी सहायक सुरेश शेळके, विकास गडाख, वसंत खांडवी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Demonstration of automatic paddy planting machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.