चांदोरी येथे आपत्ती व्यवस्थापन समितीच्या जवानांची प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 08:57 PM2020-07-17T20:57:02+5:302020-07-18T00:43:34+5:30
चांदोरी : येथील गोदावरी नदी पात्रात महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनने तयारी पूर्ण करीत प्रांताधिकारी अर्चना पठारे,तहसीलदार दीपक पाटील, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निरीक्षक खंडेराव रंजवे,सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिके केली.

निफाड तालुक्यातील गोदाकाठ असो किंवा जिल्ह्यातील कोणतेही गाव असो, त्या गावात एखादी आपत्ती घडल्यास तत्परतेने हजर होत आपत्ती व्यवस्थापन समितीकडून बचाव कार्य करण्यात येते. या समितीकडून मॉक ड्रिल तसेच नागरिकांना पूरपरिस्थितीत स्वत:ला वाचवण्यासाठी काय करावे, एखादी व्यक्ती बुडून बाहेर आल्यास त्याच्यावर प्रथमोपचार कसे करावेत याबाबत माहिती दिली. तसेच पूर पाण्यात बोट कशी चालवावी, बुडणाºया व्यक्तीला कसे वाचवावे याबाबत प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली.
त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या भागात जोरदार पाऊस झाला की, दारणा व गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. या विसर्गामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली की, नदीकाठच्या गावात व शिवारात पाणी शिरते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते व जनजीवन विस्कळीत होते.
या महापुरात अनेक लोक पुरात अडकलेले असतात तसेच गावात अन्न धान्य पुरवठा करण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन समितीचे जवान करीत असतात. यावेळी तलाठी निखिल शिरोदे ,सत्यम चौधरी ,शशिकांत चिताळकर , मंडल अधिकारी विनोद काकड ,
वाल्मिक गडाख व आपत्ती व्यवस्थापन समितीचे जवान उपस्थित होते.
आमची संपूर्ण टीम पूरपरिस्थितीचे काम करण्यासाठी सज्ज असून आम्ही सराव व प्रात्यक्षिके करीत आहोत. फक्त शासनाने आम्हाला पूरपरिस्थिती बचाव कार्यासाठी लागणाºया वस्तू लवकर उपलब्ध करून द्याव्यात.
- फकिरा धुळे, सदस्य आपत्ती व्यवस्थापन समिती