५ ते २८ एप्रिलदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:14 AM2021-03-20T04:14:09+5:302021-03-20T04:14:09+5:30
बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेतली जाते. यंदा या दोन्ही परीक्षा एप्रिल व मे या ...
बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेतली जाते. यंदा या दोन्ही परीक्षा एप्रिल व मे या महिन्यात घेतल्या जाणार आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी या दोन्ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. त्यानुसार माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधित होणार असून बारावीच्या परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधित होईल. त्यापूर्वी दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल या कालावधित घेण्यात येणार आहे. तर बारावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा ५ ते २२ एप्रिल या दरम्यान घेतली जाणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षा सुरक्षित व सुरळितपणे पार पाडण्याच्यादृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असून लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळातर्फे येत्या दोन दिवसांत सर्व परीक्षा केंद्र, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.